ग्रामीण विपणन
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार
ग्रामीण विपणन समजून घेण्याच्या आधी आपण सुरवातीला आपण नक्की ग्रामीण भाग आणि विपणन प्रक्रिया समजावून घेऊ. आपण भारतामध्ये राहतो. भारतामधील जवळ जवळ ७०% भाग हा ग्रामीण भागाने व्यापलेला आहे तर उर्वरित भाग हा शहरी भागात व्यापला गेला आहे. (Business Standand, २०११). मग हा ग्रामीण भाग ज्या ज्या गोष्टींवर आपली उपजीविका करतो आहे त्याद्वारे त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. हे रोजगाराचे साधन मुख्यत्वे 'शेती' या प्रमुख व्यवसायावर अवलंबून असते. शेती हा प्रमुख व्यवसाय आहेच मात्र त्याच सोबत ग्रामीण भागातील बरेच जण हे अन्य दुय्यम व्यवसायांवर देखील अवलंबून असतात. मग या व्यवसायांमध्ये कुक्कुटपालन, दुध व्यवसाय, शेळ्या-मेंढ्या पालन, मासेमारी आणि यांसारखे बरेच व्यवसाय करीत असतात. मात्र हे सर्व व्यवसाय करताना या व्यवसायामधून योग्य रित्या नफा मिळणे हे देखील महत्वाचे आहे. आणि हा नफा सातत्याने मिळणे देखील गरजेचे आहे. यासाठी जे उत्पादन म्हणजेच ज्या वस्तू किंवा सेवा ग्रामीण भागातून विक्री केल्या जातात त्यांचे योग्य रित्या विपणन देखील झाले पाहिजे. या विपणनाद्वारे ग्रामीण भागातील ग्राहक त्या वस्तू किंवा सेवांकडे आकर्षित होऊ शकतो आणि याप्रकारे त्या वस्तू किंवा सेवांचा खप जास्तीत जास्त प्रमाणात होण्यास मदत होऊ शकते.
मात्र ग्रामीण भागातील हे विपणन शहरी भागातील विपनानासारखेच असते असे नाही. उदाहरणार्थ म्हणून आपण समजावून घेऊ की ग्रामीण भागात बहुतांशी जी परिस्थिती असते ती शहरी भागांपेक्षा वेगळी असते. ग्रामीण भागातील एखादा व्यक्ती शहरी भागातील व्यक्तीप्रमाणे श्रीमंत असेलच असे नाही. श्रीमंत असला तरीही त्याच्याकडे टीव्ही, रेडीओ किंवा वर्तमानपत्रे यांच्यासारख्या सोई असतीलच असे नाही. टीव्ही किंवा रेडीओ असला तरीही हवे त्या वेळेत ग्रामीण भागात सतत विद्युत पुरवठा असेलच असे नाही. त्यामुळे टीव्ही किंवा रेडीओ सारख्या माध्यमातून सतत होणारे जे प्रभावशाली विपणन होते त्याद्वारे ग्रामीण भागातील व्यक्ती कधीच आकर्षित होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी थोडे वेगळ्या प्रकारच्या विपणन पद्धतीचा विचार करणे गरजेचे असते. या विपणन पद्धतीसाठी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा कोणकोणत्या आहेत हे देखील पाहणे गरजेचे आहे.
ग्रामीण विपणन :
ग्रामीण भागातील वस्तू किंवा सेवांचे विपणन करण्यासाठी ज्या योजना किंवा धोरणे आखली जातात त्याला 'ग्रामीण विपणन' असे म्हणतात.
'ग्रामीण विपणन' ही विशिष्ट ग्रामीण वस्तू आणि सेवा विकसित करणे, त्यांच्या किंमती ठरविणे, प्रोत्साहन देणे आणि वितरित करण्याची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे ग्रामीण ग्राहकांना त्यांच्या गरजा भागविणे शक्य होते व संघटनात्मक उद्दीष्टे पूर्ण करता येतात. (जयदीप)
वरील व्याख्या विस्तारित पणे समजावून घेण्यासाठी आपण त्यातील काही महत्वाच्या शब्दाप्रयोगांकडे लक्ष दिले पाहिजे;
१) ग्रामीण भागातील वस्तू किंवा सेवा विकसित करणे: ग्रामीण भागातील ग्राहकांच्या गरजा या शहरी भागातील ग्राहकांच्यापेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना जी उत्पादने हवे असतील ती शहरी भागातून निर्माण होतील असे नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील या ज्या गरजा आहेत त्या ओळखून त्याच अनुषंगाने वस्तू आणि सेवांची निर्मिती केली पाहिजे. यामध्ये ग्रामीण ग्राहकांचे वेगळेपण निर्मिती करणाऱ्याने लक्षात घेतले हवे.
२) ग्रामीण वस्तू आणि सेवांच्या किंमती ठरवणे: ग्रामीण भागातील ग्राहक हा तेथील मर्यादित उपलब्धतेनुसार वस्तू आणि सेवांची खरेदी करीत असतो. या वस्तू किंवा सेवा या ग्राहकाला परवडतील का या दृष्टीकोनातून त्या किंमती ठरविल्या गेल्या पाहिजेत. शहरी भागातील ग्राहकासाठी एका वस्तू किंवा सेवेला पर्यायी वस्तू / सेवांची उपलब्धता असते. तेथे विविध वस्तू वेगवेगळ्या दर्जानुसार उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये देखील फरक असतो. मात्र ग्रामीण भागात या सर्व वस्तू ग्रामीण ग्राहक खरेदी करेलच असे नाही. किंवा त्याला त्या वस्तू परवडतीलच असे नाही. त्यामुळे ग्रामीण वस्तूंच्या किंवा सेवांच्या किमती या एका वेगळ्या धोरणानुसार आखणे हे अतिशय महत्वाचे ठरते.
३) प्रोत्साहन देणे : ग्रामीण भागातील वस्तू आणि सेवा यांची जी निर्मिती होण्यापासून त्या वस्तू ग्राहकापर्यंत विक्री होणाच्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे देखील ग्रामीण विपणनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण त्यांना प्रोत्साहन मिळाले तरच ती उत्पादने सातत्याने ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असू शकतात.
४) वितरण : ग्रामीण भागातील वस्तूंचे वितरण शक्यतो ग्रामीण बाजारपेठांच्या द्वारे सहज शक्य असते. बाजारपेठांमध्ये या वस्तू ग्राहकांच्या गरजेनुसार उपलब्ध होत आहेत का तरच त्या विपणन प्रक्रियेस अर्थ राहतो. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात त्याने तूर किंवा कापूस या पिकाचे उत्पादन घेतले आहे. आणि त्याला तुरीवर किंवा कापसावर येणाऱ्या कीटकांचा नाश करण्यासाठी कीटकनाशक हवे असेल तर त्याला लावणी ते काढणी याच हंगामात त्या उत्पादनाची गरज भासणार आहे. त्यामुळे त्या वेळेत त्याला कीटकनाशकाचे वितरण होणे अत्यावश्यक आहे.
वरील चारही गोष्टींमध्ये ग्राहक वस्तू किंवा सेवा प्राप्ती झाल्यावर समाधानी तर होतोच, त्याचसोबत जी संस्था या विपणन करीत आहेत त्यांचे देखील कार्य विक्री प्रक्रिया वाढून पूर्ण होताना दिसून येते.
ग्रामीण विपनानाची व्याप्ती
ग्रामीण भागातील विपणन लक्षात घेता सर्व प्रथम ग्रामीण भागातील विपणन हे ग्रामीण भागातील वस्तू किंवा सेवा यांवर अथवा ग्रामीण भागातील उत्पादक यांच्याशी संबधित न राहता, त्याचा काहीसा परिणाम शहरी भागातील विपणन प्रक्रियेशी पण संबंधित असतो हे सांगता येईल.
| पासून / पर्यंत | ग्रामीण भाग | शहरी भाग |
|---|---|---|
| ग्रामीण भाग | ग्रामीण वस्तू आणि सेवांचे ग्रामीण विपणन | १. शेती व संबधित उत्पादने २. ग्रामीण कारागीर आणि ग्रामीण उद्योग उत्पादने |
| शहरी भाग | १. उपभोग्य व टिकाऊ शेतीविषयक साधने २. उपभोग्य वस्तू ३. ग्राहकोपयोगी वस्तू |
ग्रामीण विपनानात सहभागी नाही |
ग्रामीण विपनानातील मुलभूत तत्वे समजावून घेताना ग्रामीण विपनानाची व्याप्ती देखील समजावून घेणे गरजेचे आहे. ग्रामीण विपणन हे ग्रामीण संस्कृती किंवा ग्रामीण भागातील व्यवसायांना कसे पोषक ठरते हे ग्रामीण विपनानाच्या व्याप्ती वरून सहज लक्षात येते.
ग्रामीण विपणनावर परिमाण करणारे घटक
भारत हा विकसनशील देश आहे. भारताने मागील काही वर्षांत आमुलाग्र असे बदल बाजारपेठेच्या बाबतीत केलेले दिसून येतात. या बदलांना अनुसरून भारतात आर्थिक, सामाजिक, आणि तांत्रिक बदल पुरेपूर झालेले दिसून येतात. भारतामध्ये याच कालखंडात उदारीकरण, खाजगीकरण, आणि त्यापाठोपाठ जागतिकीकरण देखील आले. भारतामध्ये बऱ्याच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्रवेश केला.
भारताने देखील आयटी, ऑटोमोबाईल, कापड उद्योग, किंवा अभियांत्रिकी उद्योगांमध्ये आपली निर्यात वाढवली आहे. त्यामुळे एकंदरीच स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण ग्राहकांची संख्या अधिक असल्याने कृषी क्षेत्रासोबत मिळणारा महसूल १७% ने कमी आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या जास्ती असल्याने तेथे उत्पन्न कमी तर उपभोग दर जास्त आहे असे चित्र बघायला भेटते. ग्रामीण ग्राहक सध्या पूर्वीसारखा कमी शिकलेला किंवा कमी माहिती असलेला असा राहिलेला नाही तरीही बऱ्याच गोष्टी अजूनही ग्रामीण विपनानावर परिणाम करतात.
सामाजिक - सांस्कृतिक घटक
ग्रामीण विपणनाचा विचार करता सामाजिक - सांस्कृतिक हे ग्रामीण विपणनाच्या पर्यावरणातील महत्वाचे घटक आहेत. सामाजिक सांस्कृतिक वातावरण बनण्यासाठी संस्कृती, परंपरा, विश्वास, मुल्ये, आणि काही ठराविक लोकांची जीवनशैली या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. ग्रामीण ग्राहक काय आणि कसे खरेदी करतात यावर या वरील सर्व गोष्टी मोठा प्रभाव पाडतात.
संस्कृती :
धर्म, भाषाशैली, त्यांना अनुसरून शिक्षण आणि एकंदरीतच संगोपन या चारही गोष्टींना अनुसरून संस्कृती बनते. संस्कृतीवर बऱ्याचदा धर्माचा पगडा मोठा असलेला दिसून येतो. त्यामुळे त्याला अनुसरून ग्रामीण भागातील लोक अगदी खाण्यापिण्याच्या सवई, खरेदी पद्धती किंवा कशा प्रकारे जीवनमान आहे त्याला अनुसरून कोणत्या गोष्टी / उत्पादने स्वीकारायची याकडे लक्ष देतात. ग्रामीण विपणन करताना तेथील हीच संस्कृती लक्षात घेणे हे अतिशय महत्वाचे असते.
एखाद्या ग्रामीण भागात एखाद्या प्रसिद्ध देवतेच मंदिर असेल तर त्या भागात फुले-हार, स्थानिक देवतांचे फोटो, माळा, प्रसाद, हळद-कुंकू आणि एकंदरीतच पूजेचे संपूर्ण साहित्य उपलब्ध असते. नवीन येणाऱ्या ग्राहकांना या सामानाविषयी एक वेगळीच आस्था असते. मुस्लीम दर्ग्याजवळ चादर किंवा गुलाबाची फुले विकत ठेवलेली दिसून येतात. शहरी भागात देखील या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र ग्रामीण भागात या गोष्टी संस्कृतीला अनुसरून असतात. संस्कृतीला तडा जाणार नाही आणि संस्कृती ही अखंड चालू राहील या गोष्टीकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे ग्रामीण विपणन करताना ग्रामीण ग्राहकांच्या भावना लक्षात घेणे अतिशय आवशयक असते.
सामाजिक वर्ग
ग्रामीण भागामध्ये बऱ्याच विविध घटकांमुळे सामाजिक वर्गाची निर्मिती होत असते. एखाद्या व्यक्तीचे मासिक किंवा वार्षिक उत्पन्न किती आहे? व्यवसाय कोणता करतो आहे? शिक्षण किती झाले आहे? या सर्वांच्या आधारे सामाजिक वर्ग तयार होतो. प्रत्येक वर्गाच्या घटकानुसार आपले जीवनमान कसे जगायचे त्यासाठी अत्यावश्यक गोष्टी नक्की कोणत्या आहेत. यानुसार त्यांचे ग्राहक म्हणून चित्रण वेगळे दिसते. ग्रामीण भागामध्ये सर्वच शेतकरी हे गरीब किंवा कमी शिकलेले असे नसते. मात्र दोन भिन्न परिवारामध्ये त्यांच्या याच वर्गानुसार खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये तफावत दिसून येते.
सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण :
आपल्याकडे असणारा समाज व त्त्याला अनुसरून वावरण्याच्या पद्धती यांमध्ये धर्म, जाती, भाषेचे प्रकार यांच्यानुसार प्रत्येक ठिकाणी बराच फरक दिसून येते. अगदी छोट्या छोट्या परीवारांपासून मोठ मोठ्या राजकीय गटांमध्ये हा फरक दिसतो. आणि त्यानुसार त्या त्या ठिकाणी नक्की काय उत्पादन असावे त्या उत्पादनाचा आकार, प्रकार, रंग यांमध्ये ग्राहक त्यांची पसंती दर्शवितो. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये खेड्यांमध्ये लग्नाला मुलींच्या साडीचा रंग हिरवा असणे याला प्राधान्य देतात तर बिहार किंवा मध्यप्रदेशमध्ये लाल रंगाची साडी घेणे पसंत केले जाते.
ग्रामीण भागातील याच वेगवेगळ्या गरजा ओळखून तेथे बाजारात उत्पादनांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. कॅटबरी या कंपनीने केलेल्या संशोधनानुसार ग्रामीण भागातील महिला या त्यांच्या मुलांसाठी चॉकलेट पेक्षा चॉकलेटची चव लागणारी बिस्किटे खाऊ घालणे पसंत करतात. या ज्या भावना बाजारपेठेत जर सिद्ध होत असतील तर त्याचा एक वेगळा परिणाम पुढे येताना दिसतो.
जातीय संरचना
भारतामध्ये पूर्वीपासून जातीय संरचना दिसून येते. भारतामध्ये विविध धर्म तर आहेतच. प्रत्येक धर्मानुसार विविध जातीप्रकार येथे वेगवेगळ्या प्रकारे येथे दिसून येतात. भारतामध्ये हिंदूधर्मीय लोक हे जास्त संख्येने राहत असल्याने या धर्मात पूर्वीपासूनच चार वर्ण व्यवस्था दिसून येतात ज्यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशी अनुक्रमे वर्णव्यवस्था दिसून येते. ब्राम्हण या वर्णाला या जातीय संरचनेमध्ये सर्वात वरिष्ठ स्थान दिले आहे. त्यांच्या मतानुसार काय योग्य काय अयोग्य, पूजेचे नियम, धर्माचे नियम हे पुढे येताना दिसतात. क्षत्रिय हा लढाऊ किंवा आपल्या भागाचे सौरक्षण करताना दिसतात. प्रत्येक ऐतिहासिक राजदरबारात राजा जा क्षत्रिय तर त्याच्या दरबारात सल्लामसलत करण्यासाठी ब्राम्हण वर्ण दिसून येतो. तसेच वैश्य वर्णातील लोक हे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय जास्ती करून दुकानदारी व्यवसाय करीत होते. तर शुद्र लोकांना कनिष्ठ प्रकारच्या कामांचा तसेच ज्या कामांचा अस्वीकार इतर वर्णांनी केला आहे अशी सर्व कामे या शुद्र लोकांनी केलेली दिसतात. आज भारत १९४७ साली स्वतंत्र झाला मात्र या वर्णव्यवस्थेच्या विळख्यातून बाहेर येणे थोडे कठीण वाटते. शहरी भागात शिक्षण किंवा विकासामुळे वर्णव्यवस्था थोडी कमी झालेली दिसते मात्र ग्रामीण भागात अजूनही वर्णव्यवस्थेची पाळेमुळे खोलवर रुजलेली दिसतात.
ग्रामीण भागात अजूनही या वर्णव्यवस्थेला शुद्र समजले जाणारे व्यक्ती बळी पडतात. ते सामाजिक आणि आर्थिक गोष्टींच्या पासून वंचित आहेत. इतकेच नाही तर काही ठिकाणी त्यांना अस्पृश्य म्हणजे स्पर्श करण्यास बंदी असे समजले जाते. त्यानुसार त्यांना मंदिरामध्ये किंवा गावातील काही भागांमध्ये इतकेच नव्हे तर पाणी पिण्याच्या स्त्रोत जसे की विहीर, नदी, तलाव या ठिकाणी देखील वावरण्यास बंदी असते. या व्यक्तींना गावापासून दूर अशा ठिकाणी राहण्याची जागा दिली जाते.
काही शहरी भागात पुढाकाराने काही बदल दिसून येतात. वर्णव्यवस्था किंवा जातीव्यवस्थेची बळकटी कमी झालेली दिसून येते. विपणन करणाऱ्यांना या जातिव्यवस्थेशी काहीही संबंध नसतो. मात्र ग्रामीण भागातील लोक काही उत्पादने जर कनिष्ठ वर्गातील लोकांनी निर्माण केली असतील तर ती घेण्यास टाळाटाळ करणे किंवा स्पष्ट नकार देणे या गोष्टी पुढे येऊ शकतात.
विक्रेत्यांनी कोणत्याही उत्पादनाचे विपणन किंवा जाहिरात करताना ग्रामीण भागातील कोणत्याही प्रकारच्या जाती व्यवस्थेबद्दल संवेदनशील राहून विपणन केले पाहिजे.
लोकसंख्याशास्त्रीय घटक
जेंव्हा लोक्संख्याशास्त्रीय घटकांचा विचार केला जातो तेंव्हा आकारमान, वय, लिंगभाव, शिक्षण, व्यवसाय - धंदा, जागेचे मालकी हक्क, आणि उत्पन्न या गोष्टींचा विचार केला जातो. त्याआधी आपण या सर्व लोक्संख्याशास्त्रीय गोष्टी कशाला आधारभूत असतात ते पाहूयात.
१) ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या : मागील दोन दशकात ग्रामीण भागातील लोकसंख्या २०० मिलियन्स ने वाढलेली दिसून आली आहे. (कश्यप, २०१२ )
२) बदलते ग्रामीण कुटुंबाचे चित्र: ग्रामीण भागात शक्यतो सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतात. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे आणि काही सामाजिक अर्थशास्त्रीय घटकांमुळे जसे की शिक्षण, उत्पन्नाचे विविध स्त्रोत आणि स्थलांतर, अशा घटकांमुळे एकत्र कुटुंबामध्ये राहण्याची पद्धत बदलत जात आहे व बरेच लोक संयुक्त कुटुंबात राहतात.
लोकशास्त्रीय घटक यामध्ये काय महत्वाची भूमिका बजावतात ते देखील अभ्यासणे गरजेचे असते;
वय: जनगणनेनुसार ग्रामीण भागामध्ये १५ ते ३४ या वयोगटातील ३५% लोक हे सर्वाधिक आहेत जे भविष्यकाळातील जनगणनेमध्ये वाढण्याची शक्यता जास्त आहे.
शिक्षण : इंडियन रिडरशिप सर्व्हेनुसार ग्रामीण भागातील २०% जनता ही दहावी / बारावी उत्तीर्ण झाली आहे. २००० साली ग्रामीण भागातील साक्षरता दर ५३% होता जो २०१० साली ६३% झाला. साक्षरता दर हा भारतातील दक्षिणेकडील भागात उत्तरेकडील भागांपेक्षा अधिक दिसून येतो.
व्यवसाय : बहुतांशी भारतीय ग्रामीण भागतील लोकांचा शेती हाच व्यवसाय असतो. मात्र हळूहळू काही लोक अपारंपारीक व्यवसाय करण्यास पुढे येऊ लागले आहेत. ज्यामध्ये लोक दुकानदारी किंवा कुशल कामगारांची गरज असेल असे काम, अगदी मासिक वेतन व्यवस्थितरित्या भेटेल असे काम करण्यासाठी पुढे येण्यास सरसावतात. शेतीकडे कमी लक्ष देण्याची तशी काही कारणे पुढे येताना दिसतात, जसे की, जमिनीचे होणारे तुकडे, कमी उत्पन्न, संयुक्त परिवारांची निर्मिती इ.
जमिनीचा मालकी हक्क : ग्रामीण भागातील जमिनीचा मालकी हक्क हा बहुतांशी शेतीसाठीच राखीव असतो. ग्रामीण भागातील ही जमीन त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबातील एकूणच व्यक्तींच्या सुरक्षा, सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थितीचे प्रतिक असते. ग्रामीण भागात बऱ्याच कारणांमुळे शेतीचे तुकडे होताना दिसतात.
उत्पन्न : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुमारे ५६% उत्पन्न हे ग्रामीण भागातून निर्माण होते. हे एकूणच उत्पन्न शेती आणि ग्रामीण भागातील विविध उत्पन्नांवर अवलंबून असते.
भौतिक घटक
ग्रामीण भागातील भौतिक वातावरण हे त्या भागातील लोकांची राहण्याची पद्धत आणि ग्रामीण भागातील घरांच्या प्रकारावर अवलंबून आहे.
घरकुलांचे प्रकार : गावामध्ये घरकुलांचे प्रकार हे वस्तीच्या जमिनी किंवा लागवडीची जमीन हे वर्गीकरण असते. ज्या घरकुलांच्या जमिनी असतात त्या एकत्रित वस्तीमध्ये किंवा वैयक्तिक खाजगी वेगळ्या अशा पद्धतीमध्ये असतात. काही ठिकाणी एकत्रित कुटुंबातील लोक एकत्रित राहतात. तर काही वस्त्या किंवा वाड्या ठराविक जातीच्या प्रकारानुसार एकत्रित अशा प्रकरच्या दिसून येतात.
गावातील या वाडी किंवा वस्तीमध्ये कमी प्रमाणात दुकानांची संख्या दिसून येते.
घरांचे प्रकार : एखाद्या गावातील अर्थशास्त्रीय विकास त्या गावातील घरांचे प्रकार कसे आहेत यावरून त्वरित लक्षात येतो. गेल्या वीस वर्षात ग्रामीण भागात एक मोठा बदल समोर आलाय तो म्हणजे अस्थायी, किंवा शेणामातीने सारवलेल्या कच्च्या किंवा अर्ध्या पक्क्या घरांच्या ऐवजी ग्रामीण भागात स्थायी स्वरूपातील अगदी पक्की घरे बांधण्यात आलेली दिसून येतात. कौलारू घरांच्या ऐवजी स्लॅपची घरे दिसून येतात. साधारण ज्या व्यक्तींचे उत्पन्न कमी आहेत असे व्यक्ती कच्च्या घरांचा आधार घेताना दिसतात .
राजकीय घटक
जर भारतीय ग्रामीण भागांचा इतिहास बघितला तर गावांमध्ये सरपंच किंवा गावाचा मुखिया हा संपूर्ण गाव स्वत:च्या आदेशानुसार चालवत असे. ग्रामीण भागातील एकसत्ता ही गावांमधील पंचांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार कार्यवाही करीत असे. या पंचांमध्ये फक्त उच्च वर्णातील लोकच समाविष्ट असायची. मात्र भारतीय संविधानानुसार पंचायत राज बदलले ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, इ सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या.
पंचायत राज : ग्रामीण भागातील पंचायती मध्ये दर पाच वर्षांनी मतदान होते. यावेळी मागसवर्गीय, आदिवासी आणि महिलांना (३३ % पर्यंत) आरक्षण देखील असते. पंचायतीला काही ठराविक अधिकार दिले जातात. ज्याद्वारे ग्रामीण विकास व सामाजिक न्याय या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. पंचायत राज्यात ग्रामसभा देखील भरविल्या जातात. साधारण तीन महिन्यातील या सभेत बऱ्याच गावातील विकास किंवा समस्यांवर तोडगे काढले जातात. सभा या साधारण प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन अशा दिवशी सर्व एकत्रित जमतील या हिशोबाने केल्या जातात. गरजांना अनुसरून पुढे कोणते काम हाती घ्यावयाचे आहे, ग्रामीण भागातील परिस्थिती प्रामुख्याने आर्थिक सुधारण्यासाठी उपाययोजना, काही गटांकडून काही प्रश्न उपस्थित होत असल्यास ते, तसेच ग्रामीण भागातील विकास कामांचे वित्तीय नियोजन या बैठकीत चर्चिले जातात. ज्या गावाची लोकसंख्या ५००० आहे किंवा काही वाड्या वस्त्या मिळून काही भागातील एकूण लोकसंख्या ५००० होत असेल त्या ठिकाणी ग्राम पंचायत असते.
तांत्रिक घटक
ग्रामीण भागात वाढत्या तंत्रज्ञान हे शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान, संदेशवहनाच्या प्रबळ सोई हे हरितक्रांती नंतर झपाट्याने वाढलेले दिसून आले आहे.
वाढते यांत्रिकीकरण : शेतीमध्ये शाश्वत विकास करायचा असेल तर यांत्रिकीकरण हा पर्याय सध्या वाढलेला असा दिसून येतो. यांत्रिकीकरणाच्या वापरणे वाढत्या वापराने शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा योग्य मोबदला वेळेत मिळू शकतो असे म्हणावयास हरकत नाही. मनुष्यबळ आणि बैल किंवा इतर जनावरांच्या सहाय्याने शेतीपेक्षा टॅक्टरच्या अधिकाधिक वापर शेतात केल्यास यांत्रिकीकरणाचा वापर वाढण्यास सुरुवात होते. आणि एकंदरीतच उत्पादन अधिकाधिक वाढते.
माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहन : माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहन यांमुळे ग्रामीण भागातील संपूर्ण जीवनमान बदलून गेले आहे. सध्या संगणक, इंटरनेट आणि मोबाइल फोन यांच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातील लोक त्यांच्या बऱ्याच व्यवहारात या सर्व गोष्टींचा वापर सर्रास करताना दिसतात. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरा आधीच ई - चौपाल सारखे प्रकल्प आपल्या भारतात सुरु झाले ज्या द्वारे शेतकरी त्यांचे कृषी उत्पादने जवळच्या स्थानिक बाजारपेठेत (मंडई) मध्ये विक्री करू शकतात. या अशा गोष्टी मुळे सध्याचे शेतकरी अधिकाधिक प्रगत, पुढारलेले, आणि हुशार झाले आहेत. या प्रकल्पाद्वारे सुमारे चार मिलियन शेतकरी फायदा घेत आहेत.
ग्रामीण विपनानाची धोरणे
ग्रामीण विपनानाची धोरणे लक्षात घेताना सुरवातीला विपणन मिश्र देखील लक्षात घ्यावे लागणार ज्यामध्ये विपणनाचे चार 'पी' समोर येतात.
१) Product (उत्पादन)
२) Price (किंमत)
३) Promotion (विक्रयवृद्धी)
४) Place (स्थळ)
वरील चारही पी चा जेंव्हा ग्रामीण भागातील विपनानाशी ताळमेळ करण्याचा प्रयत्न केला तर तो थोड्या वेगळ्या पद्धतीने समोर येतो.
१) Product (उत्पादन) : व्यक्तीची कोणत्याही प्रकारची गरज किंवा इच्छा ज्याद्वारे पूर्ण होते आणि तो संतुष्ट होतो आपण त्याला उत्पादन म्हणतो. याचे सेवा आणि वस्तू असे आपण वर्गीकरण देखील करू शकतो. ज्यावेळी आपण बाजारातून खोबरेल तेल विकत घेतो तेंव्हा ती वस्तू असते, मात्र ज्या वेळी आपण डोक्याला तेल मॉलिश करतो तेंव्हा ती ग्राहकासाठी सेवा असते. आपण तेलाला स्पर्श करू शकतो मात्र ज्यावेळी आपण एखादा चित्रपट चित्रपटगृहात बघतो त्यावेळी आपण तो बघतो आणि परततो. अशी मनोरंजनात्मक सेवा ही क्षणिक असते जिला स्पर्श होत नाही. प्रत्येक उत्पादनात आकारानुसार, रंगानुसार, त्याच्या वेष्टनानुसार, लोगो आणि ब्रंड नावानुसार फरक पडतो.
साठवणुकीचे ठिकाण : सर्व प्रकारच्या कंपन्या त्यांची उत्पादने साठवून ठेवण्यासाठी उत्तम प्रकारच्या साठवणुकीच्या ठिकाणाची व्यवस्था करतात. यासाठी प्रशस्त हवेशीर गोदामांची किंवा शीतगृहांची उत्तम सोय असेल अशी उत्तम व्यवस्था उत्पादनांनुसार केली जाते. इंग्रजीमध्ये याला Stock Keeping Units (SKU) असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनानुसार त्याची हाताळणी आणि ठेवण्याची पद्धती हि वेगळी असते. त्याचप्रमाणे त्याचे वेष्ठन, विपणन पद्धती यात देखील फरक असतो.
२) Price ()
अधिक वाचनासाठी :
२) जयदीप, ए. (n.d.). Rural Marketing: Introduction, Concept, and Definitions. Retrieved जून १६, २०२१, from https://www.yourarticlelibrary.com/marketing/rural-marketing/rural-marketing-introduction-concept-and-definitions/48725
३) डोग्रा, ब., & घुमान, क. (२००८ ). Rural Marketing Concept and Practice. चेन्नई: Mc Graw Hill Education.
४) कश्यप, प. (२०१२ ). ग्रामीण विपणन. (दुसरी, Ed.) नवी दिल्ली: पिअरसन.
Rural marketing
Prof. Alok Arjun Alka Pawar
Before we understand rural marketing we will first explain exactly the rural areas and the marketing process. We live in India. About 70% of India is covered by rural areas while the rest is covered by urban areas. (Business Standand, 2011). Then this rural area provides them with a source of livelihood through the things on which they make their living. This means of livelihood depends mainly on the major occupation of 'agriculture'. Agriculture is the main occupation but at the same time, many people in rural areas depend on other secondary occupations as well. These businesses include poultry farming, dairy farming, sheep and goat farming, fishing, and many more. But it is also important to make a proper profit from this business while doing all this business. And it is also important to make a consistent profit. For this, the products i.e. the goods or services that are sold from the rural areas should also be properly marketed. Through this marketing, consumers in rural areas can be attracted to those goods or services and thus help in maximizing the consumption of those goods or services.
But marketing in rural areas is not the same as marketing in urban areas. For example, let us explain that the situation in rural areas is different from most urban areas. A person in a rural area may not be as rich as a person in an urban area. Even though he is rich, he does not necessarily have the comforts of TV, radio, or newspapers. Whether it is TV or radio, there is no need for an uninterrupted power supply in rural areas at the right time. So people in rural areas are never attracted by the effective marketing that happens constantly through mediums like TV or radio. Therefore, it is necessary to consider a slightly different type of marketing method for individuals in rural areas. It is also important to look at the infrastructure in rural areas for this marketing method.
Rural Marketing:
Plans or strategies for marketing goods or services in rural areas are called 'rural marketing'.
‘Rural marketing’ is the process of developing, pricing, promoting, and distributing specific rural goods and services, enabling rural consumers to meet their needs and meet organizational objectives. (Jaideep)
To explain the above definition in detail, we should pay attention to some of the important terms in it;
1) Developing goods or services in rural areas: The needs of consumers in rural areas are different from those in urban areas. So the products they want will not come from urban areas. Therefore, the needs of the rural areas should be identified and goods and services should be manufactured accordingly. This should take into account the uniqueness of rural consumers.
2) Pricing of rural goods and services: Consumers in rural areas are buying goods and services according to their limited availability. Prices should be based on whether the goods or services are affordable to the customer. Alternative goods/services are available to a customer in an urban area. There are different items available in different grades. So there is also a difference in their price. But in rural areas, not all of these items will be bought by rural consumers. Or he may not be able to afford them. Therefore, it is very important to set the prices of rural goods or services according to a different policy.
3) Promoting: Promoting the way in which goods and services are produced in rural areas and the way in which those goods are sold to the consumers is also an integral part of rural marketing. Because only if they are promoted can those products be consistently available in rural markets.
4) Distribution: Distribution of goods in rural areas is easily possible through rural markets. The marketing process only makes sense if these products are available in the markets according to the needs of the customers. For example, in a farmer's field, he has grown cotton or cotton. And if he needs pesticides to kill the insects that come on the stalk or cotton, he will need that product in the same season from planting to harvesting. Therefore, it is imperative that the pesticides be distributed to him at that time.
In all four cases, the customer is satisfied with the receipt of the goods or services, as well as the organization that is doing the marketing, the work is seen to be completed by increasing the sales process.
Scope of Rural Marketing
While understanding the basic principles of rural destitution, it is also necessary to understand the scope of rural destitution. How rural marketing is conducive to rural culture or businesses in rural areas is easily understood from the scope of rural marketing.
7) Cheap products: It is not more expensive to market rural goods in the entire state or city. It is also easier to identify these products in rural areas where they are manufactured. Therefore, such products are cheaper. In rural markets (usually weekly markets), the products are available at Rs. The sale, distribution, and disposal of waste also come at a lower cost.
8) Participation in the procurement process: In urban areas, the market does not seem to be based on gender or age. But in the past, women in rural areas have often been seen preserving the culture. In many rural areas, women still wear a veil that is invisible to the naked eye. They are not involved in decision-making like buying and selling. This means that women often work in the fields. However, when the crop is ready and sold in the market, men do not involve women in the process. But in many places, women's education or women's empowerment has also led to women's participation in the procurement process. Some research has shown that 72.3% of family decisions are made jointly. So rural women and even small children are seen participating in the shopping process.
Nature and features of rural marketing
Marketing in rural areas is an emerging method in the entire marketing process. Rural marketing has some features of its own. From these various features and the nature of rural marketing as a whole, it is clear that rural marketing is a different branch of study.
1) Large and scattered market: There are approximately 750 million rural customers in India who live in 6,38,365 villages spread across India and all these villages are spread over a total area of 32 lakh square kilometers. (Dogra & Ghuman, 2008) These rural market statistics tell us how widespread rural India is and how many customers it has. 70% of India's population is dependent on these large dispersed markets.
2) Diversified and unequal market: India is said to be as diverse as we call it Sujalam Sufalam. In India, there are people who are multilingual, religious, caste, color, rural-urban, gender-based, poor-rich. The needs of all these markets are different. Even though it is called a rural area, the rural part of each place looks different. The situation is different in places where it rains more and in places where it rains less. And based on that situation, the customer generates his different needs in that market. Depending on the individual's monthly or annual income, he also decides what to buy and what not to buy, and for this he enjoys a variety of goods and services in this diverse market.
Unequal markets also emerge as customers are not the same in all places, in which diversity is found. Which sometimes appears to be based on socio-cultural factors.
3) Simple standard of living: The standard of living of the people living in rural areas is very current. Their lives are even lower than the average and high standard of living in the city. If we look at the social and economic standard of living of these people in rural areas, we see that they are somewhat backward. Some of the situational factors are responsible for their low standard of living. The first of these factors is the low level of education of the people. Other factors depend on it. (A) Inadequate literacy rate (b) Low per capita income (c) Lack of purchasing power (d) Social backwardness and (e) Inability to save in any way.
(4) Income from agriculture: Many small and big jobs are generated in rural areas and the most important occupation is agriculture. Considering the income of the entire rural area, 55% of the income is dependent on agriculture. (Dogra & Ghuman, 2008) That is why we see that rural prosperity is mostly linked to agricultural prosperity. In the last few years, there has been a lot of speculation as to whether subsistence farming in rural areas can be reduced and some other business can be done.
(5) Infrastructure: If we want to think about the development of a region in the same way that food, clothing, and shelter are the basic human needs, then the infrastructure of that region comes forward as the basic needs of that region. These include roads, warehousing facilities, messaging facilities, financial institutions, educational facilities, health facilities. Even today, 50% of villages in India are not connected by roads. (Dogra & Ghuman, 2008)
The presence and absence of infrastructure immediately show the difference between rural and urban areas. In many places, these inadequate infrastructures of goods and services make it difficult to advertise or distribute. Even though most of the rural areas today are electrified, about 46% of the rural population still uses kerosene for lighting.
Evolution of rural marketing in India
It is safe to say that Indian Vipana has a long and extensive history. The history of villages in India is very different. Basically, villages in different parts of India also seem to be settled in terms of regional-socio-cultural factors. Rural marketing has also undergone major changes in terms of consumer purchasing power, living standards, changing the role of consumers in production, changes in infrastructure, and emerging messaging facilities in villages.
The four major stages of this historic transformation of rural deprivation are as follows;
1) The first stage
It is safe to say that pre-1960 rural devastation began. This phase can be called the starting period for Indian rural marketing. The Green Revolution did not emerge during this period. Throughout this period rural distortions included the marketing of rural goods, even the sale of agricultural goods, and the marketing of rural marketing or the means of enriching agriculture. Overall, rural marketing is based solely on 'agricultural marketing'.
During this period only rural products used as raw materials in industrialization or various industries were sold in central places. For example, farmers in rural areas were selling cotton as a raw material to the textile industry. Also, jute, sugarcane, oilseeds, grapes, etc. were involved in this.
Tools, fertilizers or pesticides, tools to enrich agriculture including seeds, tractors, water pumps, modern machinery for harvesting crops were very limited. The marketing of this period included the sale of items made from wood, bamboo, and clay in rural areas. The rural market consisted of bamboo baskets, ropes, wooden bullock carts, bells or wreaths for oxen, goats, or other cattle, wooden windows and door frames, elegant utensils, and some metal utensils. All the people who sold these goods were from the unorganized sector, artisans like blacksmiths, carpenters, cobblers, and all of them were doing their business.
2) The second stage
The Green Revolution began in India when Indira Gandhi was the Prime Minister. Then, from 1960 to 1990, the second phase of rural marketing came to the fore. The Green Revolution has drastically changed the nature of agriculture in rural areas. During this period the development and use of sophisticated agricultural implements increased tremendously. The use of hybrid seeds in agriculture or the use of chemical fertilizers has led to an increase in crop growth and sales. There was a lot of equipment on the market to control the growth of these crops. Water pumps, tractors, or harvesting equipment or vehicles were also introduced during this period.
During this period many reputed vehicle companies e.g. Mahindra & Mahindra, Eicher, etc. had started a new revolution by creating alternatives to traditional farming i.e. bullock and bullock cart or traditional human farming to modern farming. He started marketing a large number of agricultural implements.
Rural products were also readily available in the rural markets during this period. Among them, KVIC (Khadi and Village Industries Commission) - ie Khadi and Village Industries Commission, Weavers, Handicraft Entrepreneurs started bringing their materials to the market in large numbers. With the help of government schemes, exhibitions of these various items started appearing in rural areas. And through such schemes, whether it was Gramshri Mela or Shilpa Mela, they were also encouraged and industries like textile, handloom, soap or shikekai, firecrackers, leather goods started appearing in large numbers in urban as well as rural markets.
A few fast-moving consumer goods (FMCG) companies had started spreading their distribution network in the rural market. In 1970, Nirma was the first company to start manufacturing rural products.
3) The third stage
In both the first and second stages of the evolution of rural marketing, rural marketing has not been taken very closely. He had certain reasons. The marketing manager was involved in how to capture the urban market. It was not possible to make a financial profit from the rural market. It was also not the case that urban markets could make a profit from rural products. Going to markets in rural areas was hardly possible. Rural areas did not have access to adequate infrastructure such as roads for production.
However, in the third phase, from 1990 to 2000, radical changes began to be seen in rural marketing. During this period, national and international companies began to look at how to participate in rural marketing.
4) The Fourth stage
Many Indian and global companies tried to get a foothold in rural marketing after the success of projects like the Shakti Project and e-Choupal. Fast-moving consumer goods (FMCG) companies like Hindustan Unilever, Godrej Dabur, Mauricio, and ITC also offered employment opportunities to people from rural areas in their company considering the issue of rural marketing. These companies have made sure that if there are people from rural areas working in their company, then opportunities in rural areas can be considered. Durable goods companies like LG and Samsung also provided employment opportunities to people in rural areas. Automobile manufacturers like Maruti, Bajaj, and Hero-Honda also set up some rural projects which made car prices cheaper. Some other companies like Microsoft, GE, Intel, Honeywell, Shell Foundation, and HPCL are bringing more and more affordable goods and services in rural areas. Came forward. Reliance launched Jio, a major mobile network connection project for rural India.
Government schemes also tried to focus on the rural market without lagging behind. The government sought to provide farmers with access to farm loans, rural employment opportunities, and infrastructure in rural areas. After 2000, the government's efforts helped bridge the economic gap between rich and poor farmers.






No comments:
Post a Comment